Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Pachole Aamhi Pachole

👤 C. Ramchandra 🎼 Prabhu Tuzya Daari Aalo ⏱️ 3:15
🎵 934 characters
⏱️ 3:15 duration
🆔 ID: 10274380

📜 Lyrics

पाचोळे, आम्ही हो पाचोळे

काय कुणासी देऊ,
काय कुणाचे घेऊ?
वणवण भटके वनांतले
पाचोळे आम्ही वादळांतले

कधी भरारी अथांग गगनी
केव्हा न कळे येतो अवनी
मोहपाश ना आम्हां कुणाचा
स्वैर अम्ही आपुले

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरीं
आणि उतरलो दरी-कपारी
वसुंधरेचे स्वरूप आम्ही
तेहि दुरुन देखिले

इतुके अमुचे असुनी काही
वैर कुणाशी कसले नाही
कसेही असो अम्ही मानतो
जीवन अमुचे भले

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings