Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Bhet Tujhi Majhi Smarate

👤 Yashwant Deo, Arun Date 🎼 Shatada Prem Karave Arun Date ⏱️ 6:04
🎵 1891 characters
⏱️ 6:04 duration
🆔 ID: 11929476

📜 Lyrics

भेट तुझी माझी स्मरते
अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी
एक ही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे
आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा
भीतीच्या विषाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते

क्षुद्र लौकिकाची खोटी
झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी
तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती
तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते

केस चिंब ओले होते, थेंब
तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची
किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा
प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते

सुगंधीच हळव्या शपथा,
सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न
दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर
सुवासाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings