Sharayu Teeravari Ayodhya
🎵 3502 characters
⏱️ 7:21 duration
🆔 ID: 6585084
📜 Lyrics
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
हो. नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
घराघरावर रत्नतोरणे
अवती भवती रम्य उपवने
त्यांत रंगती नृत्य गायने
त्यांत रंगती नृत्य गायने
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी
हो अलका नगरीपरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक
अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी, घरी, अंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
इक्ष्वाकू-कुल कीर्ती भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करीतो रक्षण
गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
दशरथास त्या तिघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
तिघी स्त्रियांच्या प्रीतसंगमी
तिन्ही लोकीचे सुख ये धामी
एक उणे पण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
शल्य एक ते कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळीते अभ्यंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य धनाचे
कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
हो. नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
घराघरावर रत्नतोरणे
अवती भवती रम्य उपवने
त्यांत रंगती नृत्य गायने
त्यांत रंगती नृत्य गायने
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी
हो अलका नगरीपरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक
अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी, घरी, अंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
इक्ष्वाकू-कुल कीर्ती भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करीतो रक्षण
गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
दशरथास त्या तिघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
तिघी स्त्रियांच्या प्रीतसंगमी
तिन्ही लोकीचे सुख ये धामी
एक उणे पण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
शल्य एक ते कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळीते अभ्यंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य धनाचे
कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी