Taal Bole Chipalia
🎵 1077 characters
⏱️ 3:41 duration
🆔 ID: 6585121
📜 Lyrics
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग ... || धृ ||
दरबारी आले रंक आणि राव
झाले एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि: संग ... || १ ||
जन सेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनिया बोलतो मृदुंग ... || २ ||
हरीभजनाचे सुख मी लुटावे
गात गात माझे डोळे मी मिटावे
नका करू कोणी माझ्या समाधीचा भंग ... || ३ ||
ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासीचा राणा, झाला पांडुरंग ... || ४ ||