Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gulabachi Kali

👤 Vaishali Samant, Urmila Dhangar & Amitraj 🎼 Tu Hi Re ⏱️ 3:48
🎵 3479 characters
⏱️ 3:48 duration
🆔 ID: 6894790

📜 Lyrics

ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
नटून-थटून लाजते जनू चांदनी
नटून-थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

ओ, कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो

कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

चढते-भिडते जादू नजरेची अशी
चढते-भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैर-भैर धावते

अरे, गुलाबाची कली कशी हलदीनं माखली?
आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली

कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

डोलते-बोलते सनई ताला संगे
डोलते-बोलते सनई ताला संगे
सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली

कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
नटून-थटून लाजते जनू चांदनी
नटून-थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings