Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Garwaa Pawsa Nantarcha

👤 Milind Ingle 🎼 Marathi Top Gaarva ⏱️ 5:23
🎵 2932 characters
⏱️ 5:23 duration
🆔 ID: 7064555

📜 Lyrics

पाऊस पडून गेल्यावर मन पागुळ्यांगत झाले
पाऊस पडून गेल्यावर मन पागुळ्यांगत झाले
क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबाना सावरलेल्या त्या गवताच्या काडांचा

पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे, गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे ही ओली पाऊल भरती

पाऊस पडून गेल्यावर ह्या ओल्या रस्त्यांवरती
पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला
पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला
विझवून चांदण्या साऱ्या विझलेला, शांत निजलेला

पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा

गारवा, hmm, गारवा
वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा
प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा नवा-नवा गारवा

गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे

पाण्यावर सर, सर, सर काजवा नवा-नवा
प्रिये, मनातही (मनातही) ताजवा, नवा-नवा गारवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे

अंगभर थर, थर, थर नाचवा नवा-नवा
प्रिये, तुझा जसा (तुझा जसा) गोडवा, नवा-नवा गारवा

वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा
प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा, नवा-नवा गारवा, गारवा

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings