Swar Aale Duruni
🎵 1143 characters
⏱️ 7:32 duration
🆔 ID: 8965427
📜 Lyrics
स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जीव उसासे वार्यांचे, आकाश फिकटल्या तार्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी. स्वर आले दुरुनी
विरहार्त मनाचे स्मित सरले, गालांवर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी. स्वर आले दुरुनी
पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी. स्वर आले दुरुनी