Mala he Dattaguru Disale | Aamhi Jato Amuchya Gava (1968)| Asha Bhosle |Jagdish Khebudkar| datt song

Published 24, Feb 2023


Description:
Mala he Dattaguru Disale | Aamhi Jato Amuchya Gava (1968)

#aamhijatoamuchyagava
#ashabhosle
#sudhirphadke
#jagdishkhebudkar
#umabhende
#marathioldsong
#dattaguru

आम्ही जातो आमुच्या गावा हा ९ ऑगस्ट १९६८ रोजी प्रसिद्ध झालेला एक मराठी भाषेतील चित्रपट आहे.हा चित्रपट कमलाकर तोरणे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एका प्रामाणिक उद्योजकाची कथा आहे जो, त्याच्या स्वतःच्या भागीदाराद्वारे मूर्ख बनविला जातो, तरीही त्याला तुरुंगातून पळून आलेल्या तीन कैद्यांची मदत मिळते.


ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर
सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान विचारी,
पायावर झुकले,मला हे दत्तगुरु दिसले

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरू
स्वानंदे फिरले,मला हे दत्तगुरु दिसले

तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्याभवती
औदुंबर वसले,मला हे दत्तगुरु दिसले


गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : आशा भोसले
चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा (१९६८)
दिग्दर्शक : कमलाकर तोरणे
कलाकार : उमा भेंडे

Releted More Videos

You May Also Like